फ्रीस्टाइल फुटबॉल खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य विकसित होण्यास मदत
पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये जगातील अव्वल फ्रीस्टाईल फुटबॉलपटू जेमी नाईटची कार्यशाळा संपन्न
धाराशिव – फ्रीस्टाइल फुटबॉल खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य विकसित करण्यात मदत होते्र तसेच मानसिकतेचे महत्त्व शिकवते. यामुळे पोदार एज्युकेशन नेटवर्कचा सर्वांगीण शिक्षणाला भक्कम असा पाठिंबा मिळून विद्यार्थ्यांना जीवन कौशल्ये विकसित करता येतील आणि भविष्यात भारताचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकेल, असा विश्वास अंतरराष्ट्रीय फ्रीस्टायलर फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धाराशिव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे भेटदरम्यान दिला. त्यांनी आपली कौशल्ये दाखवत क्रीडा उपक्रमाचा भाग म्हणून कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
यावेळी प्राचार्या रम्या टुटिका, उपप्राचार्य निलेश जाधव, प्रसाद पोंक्षे, स्कील डेव्हपलमेंटच्या प्रमुख ज्योती गाला, अॅकॅडमिक प्रमुख जीवन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जेमी नाईट म्हणाले, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल इतका उत्साह, प्रतिभा आणि आवड आहे हे पाहून खूप आनंद झाला. भारत फुटबॉल खेळात जागतिक खेळाडू बनू शकतो आणि कदाचित फुटबॉल विश्वचषकात लवकरच भाग घेईल अशी मी अशा बाळगतो. मला इथे यायला खूप आवडले आणि आशा आहे की मी लवकरच परत येईन .
पोदार एज्युकेशन नेटवर्कचे संचालक हर्ष पोदार यांनी विद्यार्थ्यांच्या उर्जा आणि उत्कटतेबद्दल आनंद व्यक्त केला. जेमी ने आयोजित केलेल्या या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाविषयी फोकस ठेवणे महत्वाचे आहे हे लक्षात आले. ग्रेड्सपेक्षा जास्त या आमच्या विश्वासावर ठाम राहून, आमच्या विद्यार्थ्यांनी अशा कार्यशाळेतून शिकलेल्या गोष्टींचे अनुकरण करावे अशी आमची इच्छा आहे मग ती शैक्षणिक असो किंवा गैर-शैक्षणिक असो. आम्हाला आशा आहे की आमच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सुरुवातीच्या काळात अशा रोमांचक संधी त्यांना अखेरीस सर्वात मोठ्या टप्प्यावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यास मदत करतात.
पोदार इंटरनॅशनल स्कूलतर्फे जगातील टॉप टेन ़फुटबॉल फ्रीस्टाईलर पैकी एक जेमी नाईट यांना शाळेत निमंत्रित करण्यात आले होते. जेमी नाईट यांच्या नावे अनेक गिनीज बुक विक्रम आहेत, त्यांनी प्रथमच भेट दिली. जेमी जगातील सर्वात अनुभवी आणि सर्वाधिक मागणी असलेल्या व्यावसायिक फुटबॉल फ्रीस्टाइलर्सपैकी एक आहे. पोदार एज्युकेशन नेटवर्कच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून त्यांच्या भारत भेटीमध्ये खेळावर जास्त लक्ष केंद्रित करणे आणि विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात खेळाडू आणि प्रशिक्षकांकडून उत्कृष्ट कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रे मिळविण्यात सक्षम बनवणे होते. यावेळी शाळेचे शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.