राजकिय
राष्ट्रवादीची उमेदवारी राहुल मोटेना दुसऱ्या यादीत नाव जाहीर.
कार्यकर्त्यांत जल्लोष, महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता.
धाराशिव- परंडा भूम वाशी मतदारसंघात पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने माजी आमदार राहुल मोटे यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केलेल्या उमेदवारीच्या यादीत राहुल मोटे यांचे नाव आल्याने नेमका महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हा संभ्रम या मतदारसंघात निर्माण झाला आहे
काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील घटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती त्यामुळे इच्छुक असलेले माजी आमदार राहुल मोटे यांची मोठी गोची झाली होती तरीही त्यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षात गोंधळ निर्माण झाला होता.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत राहुल मोटे यांचे नाव आल्याने महाविकास आघाडीच्या गोटात पुन्हा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.रणजीत पाटील हे माजी आमदार कै ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र आहेत तर राहुल मोटे यांनी तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
महाविकास आघाडीचे दोन घटक पक्ष असलेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आपापले उमेदवार दिल्याने नेमका कोणता उमेदवार महाविकास आघाडीचा हा संभ्रम कायम राहिला आहे.या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.महाविकास आघाडीचा नेमका कोण उमेदवार हे कदाचीत 4 नोव्हेंबरला कळेल असेही राजकीय विश्लेषक बोलत आहेत.