धाराशिव – उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना शिवसेना पक्षाच्या वतीने महायुतीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज गुरुवार दि.24 ऑक्टोबर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, उमरगा यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.
यावेळी माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड , ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे, युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, यांची उपस्थिती होती.या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने अद्याप उमेदवार जाहीर झाला नसल्याने कोणाला उमेदवारी मिळते याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे .