राजकिय

काँग्रेस पक्षाने उमेदवारीचा फेरविचार करावा

तुळजापूर तालुक्यातील मधुकरराव चव्हाण समर्थकांची मागणी,

youtube
धाराशिव –  1957 साली हातामध्ये घेतलेला काँग्रेसचा झेंडा काँग्रेस पक्षाच्या चुकीच्या निर्णयामुळे आज माझ्यापासून दूर गेला आहे परंतु आपण या निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवू असा विश्वास काँग्रेसचे नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर येथे घेतलेल्या कार्यकर्ता मेळावा मध्ये व्यक्त केला. विधानसभा मतदारसंघातील ४ हजार कार्यकर्ते उपस्थित होते.
तुळजापूर येथील श्रीनाथ लॉन्स येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ते मेळावा मध्ये काँग्रेसचे नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या आणि आपण जर अखेरपर्यंत साथ देणार असाल तर आपण निश्चित ही निवडणूक लढवू आणि जिंकून दाखवू असे सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठावर सूतगिरणीचे माजी चेअरमन अशोक मगर, माजी जि प सदस्य बाबुराव चव्हाण, माजी जि प सभापती मुकुंद डोंगरे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश चव्हाण शिवाजी गायकवाड, युवक नेते ऋषिकेश मगर, माजी जि प सदस्य अझर  मुजावर, बाजार समितीचे संचालक रामचंद्र ढवळे, माजी जि.प. सदस्य अशोक पाटील, सरपंच सुजित हंगरगेकर, सरपंच रामेश्वर तोडकरी, साधू मुळे, सरपंच  गौरीशंकर कोडगिरे, काँग्रेस नेते रोहित पडवळ, लक्ष्मण सरडे ,आशिष मोदानी, माजी नगरसेवक सुनील रोचकरी, नवाज काझी,  सुभाष हिंगमिरे, अभिजीत चिवचिवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी युवक नेते अमर माने यांनी काँग्रेस पक्षाने तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये निश्चितपणे मला बदनाम करून उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले आहे. आपण कधीही कोणत्याही इतर पक्षाचा प्रचार केला नाही तशा प्रकारचे स्पष्टीकरण त्यावेळी मी दिलेले आहे तरी दखल मुंबई आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठीकडे लेखी तक्रारी करून आपणास बदनाम करून उमेदवारी मिळवलेली आहे याची दखल जनतेने घ्यावी असे आवाहन याप्रसंगी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. 1957 साली मी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आयुष्यभर काँग्रेसला सांभाळले आजही मी वेगळा नाही परंतु पक्षाने मला वेगळे केलेले आहे याची जाणीव उपस्थित कार्यकर्त्यांनी ठेवावी, तुम्ही जर मला निवडणूक लढवण्यासाठी होकार देत असाल आणि अखेरपर्यंत माझ्याबरोबर लढण्यासाठी प्रयत्नशील असाल तर आपण निश्चित या विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय संपादन करू मला त्याचा विश्वास आहे असे उद्गार याप्रसंगी माजी मंत्री मधुकररव चव्हाण यांनी काढले. पक्षाने चुकीच्या निरीक्षणावरून उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे यासंदर्भात योग्य ते स्पष्टीकरण करण्यात यावे असे देखील याप्रसंगी मधुकरराव चव्हाण म्हणाले.
प्रारंभी प्रास्ताविक करताना माझ्यासारख्या शेकडो सामान्य घरातील मुलांना मधुकरराव चव्हाण यांनी नेतृत्व करण्याची संधी दिली आमच्या बहात्तर गावांमध्ये यापूर्वी कधीही आमदार निधी पोहोचला नव्हता तो मधुकरराव चव्हाण यांच्या माध्यमातून पोहोचला आणि ७२ गावांचा विकास झाला, पक्षाने अत्यंत अन्याय करून उमेदवारी बदलली आहे असे सांगितले.
याप्रसंगी जि प माजी सदस्य आजर मुजावर यांनी मुस्लिम अल्पसंख्यांक समाज मधुकरराव चव्हाण  यांच्यासोबत आहे असे सांगितले. नवाज काझी यांनीही निश्चितपणे या निवडणुकीत मधुकरराव चव्हाण विजयी होतील असे सांगितले. हिंगोली तालुका धाराशिव येथील लैलाबी शेख या महिलेने आपल्या रोजंदारीतील उत्पन्न मधील १० हजार रुपये रोख मधुकर चव्हाण यांना निवडणूक लढवण्यासाठी मदत केली, इतर दोन मजुरांनी प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे मधुकरराव चव्हाण यांना दहा हजार रुपये देणगी दिली.
याप्रसंगी काँग्रेसने नेते ऋषिकेश मगर यांनी मधुकरराव चव्हाण यांच्यावर काँग्रेस पक्षाने खूप मोठा अन्याय केला आहे हा अन्याय केला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मधुकरराव चव्हाण यांनी निवडणूक लढवावी आणि त्यांना विजयी करू असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी सुमारे 30 नेत्यांनी मधुकर चव्हाण यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह करणारी भाषणे केली. सभेचे सूत्रसंचालन सुजित हंगरगेकर यांनी केले व आभार माजी सभापती शिवाजी गायकवाड यांनी मानले.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close