Uncategorizedराजकिय

तुळजापुरात विधानसभेचा रणसंग्राम,

मतदार कोणाला देणार कौल ? 

youtube

तुळजापूर-धाराशिव विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला परंतु शेतकरी कामगार पक्षाचे माणिकराव खपले यांची दोनवेळा आणि पुलोदच्या माध्यमातुन शिवाजीराव बाभळगावकर  यांची एकवेळ टर्म वगळता हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात राहिला आहे.पुढे 2019 च्या निवडणुकीत मत विभाजन झाल्याने भाजपच्या ताब्यात गेला आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापूर विधानसभेचे आमदार झाले.

गेल्या पाच वर्षात बरीच राजकीय उलथापालथ झाल्याचे आपण पाहिले आहे त्यामुळे याही मतदारसंघात उलथापालथ झाली माजी आमदार मधुकर चव्हाण यांचे सुपुत्र सुनील चव्हाण हे काँग्रेसची साथ सोडून भाजपात दाखल झाल्याने मतदारसंघात मोठी उलटसुलट चर्चा झाली,याचा परिणाम लोकसभेत होऊन महायुतीच्या उमेदवाराला फायदा होईल असे वाटत होते परंतु उलटे झाले तब्बल 53 हजाराची लीड महाविकास आघाडीच्या उमेदवाराला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मिळाली होती.
आता तुळजापूर धाराशिव मतदारसंघात इच्छुकांची मोठी यादी झाली आहे.भाजपातही इच्छुकांची संख्या वाढली असून रूपामाता उद्योग समूहाचे ऍड व्यंकट गुंड हे जास्त आग्रही असून उमेदवारी जर मिळाली नाही तर बंडखोरी करण्याची तयारी त्यांनी केली असून काहीही करून निवडणूक लढवण्याचा निर्णय गुंड यांनी घेतला आहे.तसेच तुळजापूर  शहरातील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निकटवर्तीय पिटु गंगणे यांनीही निवडणूक लढवण्यासाठी बंडखोरी करणार असल्याचे बोलून दाखवल होत पण तात्काळ राणाजगजितसिंह पाटील यांनी गंगणे यांची समजूत काढली.
काँग्रेस मधून माजी मंत्री काँग्रेसचे जेष्ठ नेते  चव्हाण निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड धीरज पाटील यांनीही पक्षाकडे तुळजापूरमधून उमेदवारी मागितली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून सर्वात जास्त इच्छुक उमेदवार असून गेल्यावेळी धाराशिव येथून निवडणूक लढवलेले संजय निंबाळकर इच्छुक आहेत गेल्यावेळी वंचित बहुजन आघाडीकडुन लढलेले अशोक जगदाळे हेही इच्छुक आहेत,युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर याही इच्छुक आहेत तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉ स्नेहा सोनकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मधुकर चव्हाण यांनी सर्वात जास्त काळ या मतदारसंघाचे नेतृत्व केलं असून ते मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते तर राज्याच्या मंत्रिमंडळात पशुसंवर्धन मंत्री म्हणून काम केले आहे सर्वसामान्य नागरिकांशी चव्हाण यांचा थेट संवाद असल्याने ते या तालुक्याचे खरे मास लीडर म्हणून ओळखले जातात वयाच्या 83 व्या वर्षीही ते लोकांशी कनेकक्ट आहेत हे विशेष.
मधुकर चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात गाव तिथं साठवण तलाव बांधले असे 76 साठवण तलाव 650 पाझर तलाव,750 पेक्षा जास्त सिमेंट बंधारे, बोरी धरणावर केलेले 2 मोठे बॅरेजेस, हजारो मातीनाले,माळरान असलेले 60 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र बागायती केलं,प्रत्येक गावात पाणी पुरवठ्याची काम मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत.मधुकर चव्हाण यांनी तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासासाठी प्राधिकारणातून 315 कोटी रुपये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले होते.
दगडी धोंड्याचा गवती कुसळाचा असलेला हा भाग हरित केला,पाणी आढावा पाणी जिरवा ही योजना प्रॉपर राबवली,तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष केलं आणि त्यांनी मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी अभ्यासगट तयार करून त्यावर काम केलं, उजनीच्या 23.66 टीएमसी पाण्याची मंजुरीही चव्हाण यांनी करून घेतली असल्याचे बोलले जाते 2008 ला 19 टीएमसीची मान्यता होती परंतु ती वाढवून घेऊन 23.66 टीएमसी केली यातील 7 टीएमसी पाणी हे धाराशिव जिल्ह्याला मिळणार आहे,
विरोधातील सरकार असल्याने गेल्या दहा वर्षांपासून या योजनेसाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही तुटपुंजा निधी देण्यात आला आहे.
या पाण्याच्या बाबतीत डॉ पदमसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांचा काहीही संबंध नाही,हे पाणी मंजूर करत असताना मी मुख्यमंत्री आणि  तुम्ही मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आपण दोघेही मराठवाड्याचे असताना जर आपले हक्काचे पाणी मिळत नसेल तर पुन्हा कधीच मिळणार नाही असे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी म्हटलं होतं, या उलट याला डॉ पदमसिंह पाटील यांची आडकाठी होती त्यावेळी ते पाटबंधारे मंत्री होते अजित पवार यांच्या सांगण्यावरून डॉ पाटील यांनी त्या फाईलवर सही केली नाही.त्यामुळे रागाने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मंत्र्यांच्या अगोदर सही केली आणि त्यानंतर नाविलाज म्हणून डॉ पाटील यांनी सही केली असल्याचे बोलले जाते
चव्हाण यांचे वर्चस्व तुळजापुरात वाढू नये म्हणून कायम डॉ पदमसिंह पाटील यांनी तुळजापूर तालुक्याला पाण्यात बघण्याचे काम केलं आहे.परंतु चव्हाण यांनी या तालुक्याला पाणीदार बनवण्याचं काम केलं हे कोणीही नाकारू शकत नाही.त्यामुळेच आता इथला शेतकरी ऊसासारखी पीक घेऊन शेतकरी सक्षम व सधन झाला आहे.याच शेतकऱ्यांची पोर आता भाजपचा झेंडा हाती घेऊन मधुकर चव्हाण यांना विरोध करतोय हे दुर्भाग्य म्हणावे लागेल असे काँग्रेसचे जेष्ठ नेते पंचायत समितीचे माजी सभापती
शिवाजी गायकवाड यांनी सांगितले
गेल्या पाच वर्षात या मतदारसंघात कुठलंही भरीव काम वा लोकांच्या उपयोगाची कामे झाली नाहीत.विद्यमान आमदारांनी त्यांचा स्थानिक विकास निधी हा रस्ते बांधणीसाठी व कार्यकर्ते जगवण्यासाठी वापरला आहे.डॉ पाटील यांनी विलासराव देशमुख यांची ईर्षा धरून धाराशिवमध्ये विमानतळ सुरू केलं परंतु हेच विमानतळ तुळजापूर आणि धारशिवच्या सेंटरमध्ये केलं असतं तर आतापर्यंत तीर्थक्षेत्र तुळजापुरात विमानसेवा सुरू झाली असती.रेल्वेचंही तसेच केलं रेल्वे स्टेशन धाराशिव शहराच्या पलीकडे नेण्याऐवजी अलीकडे केलं असत तर तुळजापूरला स्वतंत्र रेल्वे मागण्याची वेळ आली नसती.त्यामुळे डॉ पाटील आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापुरला कायम पाण्यात बघण्याचे काम केलं आहे त्यामुळे आपण तुळजापूरसाठी लय मोठं काम केलंय असं यांनी म्हणायची गरज नसल्याचंही शिवाजी गायकवाड यांनी सांगितले
तर गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तीर्थक्षेत्र तुळजापुरचा कायापालट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले बालाजी देवस्थानच्या धर्तीवर तुळजापूर येथेही चांगल्या सुविधा भाविकांना मिळाव्यात यासाठी प्रयत्न केलेत
तीर्थक्षेत्र तुळजापुर सोलापूर रेल्वेसाठी प्रयत्न करून  कामास प्रारंभ झाला आहे.कृष्ण मराठवाड्याचे हक्काचे पाणी आणण्यासाठी पाठपुरावा करून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न केले.11 हजार कोटींचा निधी मंजूर झाला आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
नळदुर्ग किल्ल्याचा कायापालट करण्याचे प्रयत्न, तसेच अप्पर तहसील कार्यान्वित केलं, इनामी जमिनीचा प्रश्न निकाली लावला,शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न,सोयाबिन आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत तसेच नुकतच तुळजापूर क्रीडा संकुलाचे काम सुरू,कुरनुर प्रकल्प दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही ठळक कामे सांगितली जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close