राजकिय
आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
महाविकास आघाडीच्या उमेदवारीचे भिजत घोंगडे
आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
धाराशिव : आई तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन २४१-तुळजापूर विधानसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणूनआ. राणाजगजितसिंह पाटील यांनी गुरवारी ऑक्टोंबर रोजी नामनिर्देशन दाखल केले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील पाच वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण जनकल्याणाच्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा तुळजापूर मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या व संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या आशीर्वादाने आणि मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्या सोबतीने यंदाही विजय आपलाच असेल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.