आजचा मुहूर्त साधत डॉ तानाजी सावंत यांनी भरला उमेदवारी अर्ज
महाविकास आघाडी उमेदवारीवरून तळ्यातमळ्यात
धाराशिव –
आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी आज श्री तुळजाभवानीचे दर्शन घेऊन आजचा मुहूर्त साधत भूम परंडा वाशी विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्ह्यातील महायुतीचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने गतिमान पद्धतीने कामं केली आहेत आणि त्याच कामाची पोच पावती येत्या 23 तारखेला मतपेटीतुन मताच्या विजय रुपात मतदार आम्हाला देतील असा विश्वास मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे
या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून मोठी स्पर्धा निर्माण झाली असून काल माजी आमदार कै. ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजीत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले परंतु या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडून माजी आमदार राहुल मोटे इच्छुक उमेदवार होते मोटे यांनी आपली उमेदवारी पक्की समजून मतदारसंघात संपर्क ठेवला होता पण काल अचानक रणजीत पाटील यांचे नाव जाहीर झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता कदाचित ही उमेदवारी बदलून राहुल मोटे यांना मिळण्याची शक्यता आता राजकीय विश्लेषकाकडून वर्तवली जात आहे
आतापर्यंत तीन उमेदवारांच्या उमेदवाऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत यात महायुतीकडुन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.प्रा तानाजी सावंत,महाविकास आघाडीकडून रणजित पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रवीण रणबागुल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Byte डॉ तानाजी सावंत