Uncategorized

संविधान फाऊंडेशनच्या मागणीला यश  “घर घर संविधान”

महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर पासून  साजरा  होणार संविधानाचा  अमृत महोत्सव

youtube
इ झेड खोब्रागडे माजी सनदी अधिकारी

धाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने दि 10 ऑक्टोबर 2024 ला आदेश काढून  येत्या 26 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रभर संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” हा संविधान जागराचा उपक्रम  दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती संविधान फाऊंडेशनचे संस्थापक सेवानिवृत्त सनदी अधिकारी इ झेड खोब्रागडे यांनी दिली

संविधान फाऊंडेशनच्या वतीने आम्ही ऑक्टोबर 2022 पासून प्रधानमंत्री, कॅबिनेट सेक्रेटरी, तर राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत.  याबाबत ,आम्ही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, वरिष्ठ नेते , लोकसभेचे विरोधी पक्षनेते,महाराष्ट्रातील लोकसभा सदस्य  यांना सुद्धा  2022 पासून  निवेदने दिलीत  आणि पाठपुरावा केला. देश  पातळीवर संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान’ हा उपक्रम साजरा व्हावा यासाठी आमचा  प्रयत्न सुरू आहे.केंद्र सरकारने अजून निर्णय घेतला  नाही, तो त्वरित घेण्यात यावा अशी मागणी ही करण्यात आली आहे.

 सप्टेंबर महिन्यात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांना भेटून  पुन्हा ही मागणी केली. शोषित वंचितांच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. अजूनही मांग गारुडी, गोंड, भटके विमुक्त, मुस्लिम मदारी व इतरही वंचित समाजाला ,त्यांच्याकडे कागदपत्रे नसल्यामुळे, जातीचे दाखले मिळत नाही हे त्यांचे लक्षात आणून दिले. विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी यांचेकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे परंतु जातीचे दाखले देणे सुरू झाले नाही. त्यामुळे हा समाज सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित आहे हे त्यांचे निदर्शनास आणून दिले.याबाबत उचित निर्णय घेऊ असे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री  यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर का असेना  संविधान अमृत महोत्सव 2024-25 घर घर संविधान साजरा  करण्याचा चा 5 पानी आदेश  निर्गमित झाला. प्रत्यक्ष भेटीत आम्ही उपमुख्यमंत्री यांना सुचविले होते की 36 ही जिल्ह्यात संविधान संमेलने आयोजित करावीत व राज्यस्तरीय समिती गठीत करावी.आदेशामध्ये हे प्रस्ताव अंतर्भूत करण्यात आले आहेत. खरं तर सामान्य प्रशासन विभागाने हा आदेश काढण्याची गरज होती. असो,  या निर्णयाचे आम्ही  मनापासून स्वागत करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व विशेषतः  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही  अभिनंदन करतो व आभार मानत असल्याचे इ झेड खोब्रागडे यांनी सांगितले आहे.
 संविधान अमृत महोत्सव साजरा व्हावा यासाठी प्रयत्न करनाऱ्या  सर्वांचे मनापासून अभिनंदन व आभार. निर्णयानुसार ,कार्यक्रम राबविले गेले पाहिजे.  आझादीचा  अमृत महोत्सव ज्याप्रकारेसाजरा केला,किमान त्याप्रमाणे संविधान अमृत महोत्सव : घर घर संविधानचे कार्यक्रम, विशेषतः 36 ही जिल्ह्यात संविधान संमेलने घेतले जातील ही अपेक्षा खोब्रागडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच संविधान दिवस हा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला पाहिजे ही मागणी आम्ही केली आहे. शोषित वंचितांच्या वस्तीत संविधान घेऊन  जाणेसाठी, लाभ मिळवून देणेसाठी, जगणे प्रतिष्ठेचे करण्यासाठी, वस्तीत सेवा सुविधासाठी शासन प्रशासनाने  शोषित वंचितांचे वस्तीत जाऊन संवेदनशीलतेने, प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close