नोकरी संदर्भ
उमेदचे दीड लाख कर्मचारी करणार पुन्हा कामबंद आंदोलन
९ ऑक्टोबरला सिंदखेडराजा येथे उमेदचा महामेळावा
उमेदचे दीड लाख कर्मचारी पुन्हा कामबंद आंदोलन करणार
९ ऑक्टोबरला सिंदखेडराजा येथे उमेदचा महामेळवा
उमेदच्या कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या एकमेव मागणीसाठी सिंदखेडराजा येथे ९ ऑक्टोबरपासून राजस्तरीय अधिवेशन व
महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धाराशिव उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अलंकार बनसोडे यांनी दिली, राज्य अधिवेशनानंतर ही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना बेमुदत काम बंद व पुढे जाऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे
यापूर्वी वारंवार आंदोलने करूनही अश्वासना व्यतिरीक्त काहीच हाती लागले नाही म्हणून संविधानिक मार्गाने मा जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील सर्व उमेद कंत्राटी अधिकारी कर्मचारी राज्यातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती व गटातील सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे राज्य अधिवेशन व महामेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यास सबंध महाराष्ट्रातून दीड लाख महिला सदस्य व सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनामध्ये मायबाप सरकार माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय ग्रामविकास मंत्री महोदय गिरीशजी महाजन साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेब तसेच सर्व विरोधी पक्षनेते पक्षप्रमुख यांनी उपस्थित राहून शासनाची व आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी याबाबतची विनंती व तसे निवेदन राज्य संघटनेच्या वतीने देण्यात आलेले असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना यांच्या वतीने 04 वर्षापासून वर्षापासून न्याय मागण्यासाठी महाविकास आघाडी व महायुती सरकार या दोन्ही शासनाच्या कालावधीमध्ये सबंध महाराष्ट्रामध्ये खूप मोठा लढा सुरू केला आहे.तरीही मागण्या मान्य होत नाहीत म्हणून उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना यांनी दिनांक 10 ते 12 जुलै 2024 रोजी आझाद मैदान या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व उमेद कंत्राटी कर्मचारी सर्व समुदाय संसाधन व्यक्ती प्रेरिका व तसेच प्रभाग संघ ग्रामसंघ आणि बचत गट सदस्य यांच्या लाखोच्या उपस्थितीत आझाद मैदान मुंबई येथे भर पावसात चिखलात कसलीही परवा न करता तीन दिवस आंदोलन केले त्यादरम्यान मुख्यमंत्री यांनी आणि ग्रामविकास मंत्री यांचा मान राखून आजाद मैदानातील आंदोलन दिनांक 12 जुलै 2024 रोजी तुर्तस्तगीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता
यावेळी शासनाने दिलेल्या लेखी पत्रानुसार शासनाने अडीच महिने होऊन देखील कुठल्याही प्रकारचा निर्णय न घेतल्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना यांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यानुसार अभियानात सहभागी झालेल्या 84 लक्ष कुटुंबाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 25 सप्टेंबर 2024 पासून संविधानिक मार्गाने संप व असहकार आंदोलन सुरू केले आणि त्याचे रूपांतर 26 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभियानातील सर्व कंत्राटी कर्मचारी व सर्व समुदाय संसाधन व्यक्ती गटातील सदस्य यांच्या वतीने हजारोच्या संख्येने एकाच वेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात साखळी उपोषण करण्यात आले.
त्या सोबतच गाव स्तरावर मानवी साखळी करून शांततेत सर्वच गाव व प्रभाग स्तरावर प्रभात फेरीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांना आमचे प्रशासकीय प्रमुख अधिकारी निर्णय करते कुटुंबप्रमुख आमचे पालक म्हणून विनंती करण्यात आली तरी देखील शासनाने कुठल्याही प्रकारचा निर्णय न घेतल्यामुळे दिनांक 3 ऑक्टोबर 2024 पासून पुन्हा राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये संघटनेच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले
आजही आम्ही सर्व कर्मचारी व सर्व महिला समुदाय संसाधन व्यक्ती बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी आहोत आज आपण पाहतोय अवघ्या काही दिवसांमध्ये आदर्श आचारसंहिता लागेल त्यापूर्वी शासनाने आमच्या मागण्या मान्य करायला हव्या होत्या परंतु आज ही मागण्या मान्य झालेल्या दिसून येत नाहीत किंवा त्या प्रकारचा निर्णय शासनाने घेतलेला नसल्याने उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने आमच्या प्रमुख मागणीसाठी म्हणजेच शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे या एकमेव मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष अलंकार बनसोडे यांनी सांगितले.